Ad will apear here
Next
गांधीजींच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या गणेशमंडळांसाठी स्पर्धा
एक लाखाचे प्रथम पारितोषिक
पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे गणेश मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्माचे हे १५० वे वर्ष असल्याने गणेशोत्सवादरम्यान ही स्पर्धा होणार आहे’, अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिली. 

‘पुणे शहरात गणेशोत्सवात जी गणपती मंडळे राष्ट्रपिता महात्मा गांधींजींचे देखावे, व्याख्याने ठेवतील किंवा अन्य काही नाविन्यपूर्ण गोष्टी करतील, अशा मंडळांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रथम क्रमांकास एक लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येईल, तर गणेशात्सवात अधिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक दिले जाईल’,असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

 ‘नाविन्य, परिणामकारकता काळानुरूप योग्य संदेश, ऐतिहासिक अचूकता हे स्पर्धेसाठी निकष असतील. आजच्या संदर्भात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा कोणता राष्ट्रीय विचार, कोणत्या प्रसंगातून अधोरेखित करणे आवश्यक आहे, याची निवड हा पारितोषिकासाठी महत्त्वाचा निकष असेल. पारितोषिक निवड समितीद्वारे स्पर्धेचे परिक्षण होईल आणि निकाल जाहीर करण्यात येईल. गणपती विसर्जनानंतर पंधरा दिवसांत पारितोषिके जाहीर केली जातील. त्यानंतर महिनाभरात पारितोषिक वितरणाचा जाहीर समारंभ होईल’, असेही डॉ. सप्तर्षी यांनी सांगितले.

‘इच्छुक गणेश मंडळांनी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, सर्व्हे नंबर. ३६, गांधी भवन, कोथरूड येथे अर्ज करावेत. संस्थेकडे अर्ज सादर होतील तेवढ्या गणेश मंडळांना निवड समिती प्रत्यक्ष भेट देईल’,असेही त्यांनी नमूद केले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUOBS
Similar Posts
‘गांधी स्मारक निधी’तर्फे गांधी सप्ताहानिमित्त परिसंवाद पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहादरम्यान ‘शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन कधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात शेतकऱ्यांच्या व्यथांवर विचारमंथन करण्यात आले.
‘गांधीजींचे विचार वैश्विक कल्याणाचे’ पुणे : ‘मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला अशा अनेक जागतिक नेत्यांनी गांधी विचारातून प्रेरणा घेतली. कारण गांधीजींचे विचार मानवतेच्या कल्याणाचे, चिरंतन आणि वैश्विक आहेत. म्हणून गांधीजींच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी गांधी सप्ताहासारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले
महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘फिल्म शो’चे आयोजन पुणे : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहात विविध प्रकारचे माहितीपर चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. हे फिल्म शो गांधीभवन, कोथरूड येथे एक ते आठ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये दाखवले जातील,’ अशी माहिती ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्थेचे सचिव अन्वर राजन यांनी दिली
पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन पुणे : ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे सलग नवव्या वर्षी एक ते आठ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधीभवन, कोथरूड येथे होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,’ अशी माहिती डॉ. कुमार सप्तर्षी, संस्थेचे सचिव अन्वर राजन यांनी दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language